मेहकर येथे अतिशय साध्या पद्धतीने शिव जयंती साजरी.(shivjaynti) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, February 19, 2021

मेहकर येथे अतिशय साध्या पद्धतीने शिव जयंती साजरी.(shivjaynti)

 (सुनील मोरे मेहकर)

आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मानव सुरक्षा सेवा संघाच्या  वतीने शिवजयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तसेच अनेक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. तसेच काही कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांची परवानगी दिली आहे त्यामुळे स्थानिक शिवाजी उद्यान येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोशल डीस्टंट ठेऊन व मास्कचा वापर करून शिव जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर सर्व उपस्थितांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले.

गजानन इंगळे राष्ट्रीय महासचिव,  गजेंद्र भिसे राष्ट्रीय सचिव, अरुण पांडव राष्ट्रीय प्रमुख,  प्रविण पऱ्हाड तालुकाध्यक्ष मेहकर, मुन्ना काळे जिल्हा मीडिया प्रभारी,  आरती दिक्षित उपाध्यक्ष बुलडाणा , राजश्री पाटील महिला तालुकाध्यक्ष मेहकर,  रोहिणी पाठक उपाध्यक्ष महिला मेहकर, मानसी दिक्षित महिला सचिव मेहकर,फिरोज शहा मीडिया प्रभारी,सुनील मोरे मीडिया प्रमुख, उमेश शिलवंत. रविंद्र मानघाले , विजयानंद वायाळ, विशाल डोंगरे, शारदा डोंगरदिवे, प्रवीण सहगल, गजानन दुतोंडे,सिद्धेश्वर मानघाले, माधव झोपाटे, प्रकाश सुखदाने, आशिष मानघाले शारदा डोंगरदिवे


Post Top Ad

-->