विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवले मुलींनी बस समोरच मांडला ठिय्या
(आपला विदर्भ लाईव्ह प्रतिनिधी गजानन जाधव बेलगाव)
डोणगाव ते राजगड जाणाऱ्या बस मधून विद्यार्थी मुलींना बसमधून खाली उतरून दिल्याने शाळकरी मुलीकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा मेहकर मेहकर डेपोची बस डोणगाव येथुन बस शाळकरी मुलीला घेऊन डोणगाव ते राजगडला जाताना या मुलीला बस मधुन खाली उतरविले आणि पांगरखेड माध्यमिक शाळेतील विद्यार्थी घेऊन बस चालक वाहक पुढील गावाकडे रवाना झाले शासनाने स्त्रियांना प्रधम दर्जा दिला मात्र यांना सध्याकाळच्या पाच ते सहा वेळी च्या दरम्यान गाडी मधुन उतरुन दिल्या ने कुठे तरी वडिलांचा भावना दुखावल्या गेल्या ने मुलीने एक बस समोरच जवळपास तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
चालक आणि वाहक यांना विचारले असता आम्ही अगोदर त्यांना सांगितले होते असे उत्तर त्याच्या कडून आले मात्र महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अधिकारी भोसले यांना घटनास्थळी बोलावण्यात आले कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी खंडागळे व सायकल यांना माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झाले आणि डोणगाव कंट्रोल पॅॉईनटचे अधिकारी भोसले यांनी दिलगिरी व्यक्त केली यानंतर असे विद्यार्थीनी सोबत घडणार नाही अशी मी ग्वाही देतो यावेळी पांगरखेड येथील गणेश इंगळे गोपाल पाखरे गावकरी यांच्या साहाय्याने वाद निपटला