पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची 200 लिटरची टाकी घेऊन पोहचला ग्राहक
बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेल ही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला. तर इतर ही ग्राहक पंपावर मिळेल ती प्लास्टिक डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले. दुसरीकडे मात्र काल जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. आता प्रशासना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
.jpg)