जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा स्फोट! मातोश्रीवर शेकडोंचा ‘ठाकरे’ गटात प्रवेश - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, April 6, 2026

जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा स्फोट! मातोश्रीवर शेकडोंचा ‘ठाकरे’ गटात प्रवेश

 
जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा स्फोट! मातोश्रीवर शेकडोंचा ‘ठाकरे’ गटात प्रवेश 

लोणार-मेहकर तालुक्यातील दिग्गज नेते, सरपंच व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

बुलढाणा जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशांच्या धुमाकुळात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही जोरदार मुसंडी मारली आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते, सरपंच व शेकडो कार्यकर्त्यांचा थेट मुंबईतील ‘मातोश्री’ येथे पक्षप्रवेश पार पडला. हा प्रवेश पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाला.
एका बाजूला जिल्हाभर विविध पक्षांत प्रवेश सुरू असताना, ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनीही पुढाकार घेत पक्षबांधणीवर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात दाखल करण्यात आले. काँग्रेस व भाजपमधील अनेक दिग्गजांसह सामान्य नागरिकांनीही या प्रवेशात सहभाग घेतल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी, सहा विद्यमान सरपंच, आठ माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाकरे गटात दाखल झाले आहेत. यामुळे आगामी राजकारणात समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
या वेळी खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवंत, प्रा. आशिष रहाटे, राजू बुधवंत, जीवन घायाळ, रवी ओव्हर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
                                राजकीय विश्लेषण:
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे

Post Top Ad

-->