मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 28 लाखांवर दंड वसूल - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, September 5, 2020

मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 28 लाखांवर दंड वसूल

बाहेर पडतांना मास्क वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि.5 सप्टेंबर: जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून  जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत दिनांक 4 सप्टेंबर पर्यंत 11 हजार 495 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 23 लाख 1 हजार 690 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 270 नागरिकांकडून 39 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तर इतर कारवाई करत 4 लाख 66 हजार 970 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून असे एकूण 28 लाख 7 हजार 810 रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने कारवाई करत वसूल केलेला आहे.
  जिल्ह्यात कलम 144 लागू आहे. असा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढलेला असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 200 रु दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दंड आकारण्याची कारवाई चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत 20 एप्रिल पासून करण्यात येत आहे.
          असे आहे वसूल केलेल्या दंडाचे विवरण:
दिनांक 4 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुर अंतर्गत 2 हजार 651 मास्कन वापरलेल्या नागरिकांकडून 5 लाख 28 हजार 440 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 197 नागरिकांकडून 22 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 57 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 6 लाख 8 हजार 540  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
नगरपरिषद, नगरपंचायत अंतर्गत 6 हजार 121 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 12 लाख 20 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 65 नागरिकांकडून 12 हजार 850 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 2 लाख 53 हजार 370 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 14 लाख 46 हजार 620  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.
गटविकास अधिकारी कार्यालयांतर्गत 2 हजार 723 मास्क न वापरलेल्या नागरिकांकडून 5 लाख 52 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या 8 नागरिकांकडून 3 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर इतर कारवाई करत 1 लाख 56 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला असून असा एकत्रित 7 लाख 12 हजार 650  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

Post Top Ad

-->