पिंपरी खंदारे येथील दोन जण जागीच ठार
(आपला विदर्भ देवानंद सानप लोणार )
लोणार ट्रक व दुचाकीच्या झालेल्या समोरासमोर धडकेत 2000 झाले ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान नागपूर मुंबई महामार्गवरील बिबी शहराजवळील चिखला फाट्यावर घडली.या अपघातात पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. बंडू चौधर व दत्तात्रेय चौधर अशी मृतकाची नावे आहेत.
घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर, व दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघेजण एमएच 28 एक्यू 5350 या क्रमांकाच्या दुचाकीने बिबीवरून आपले काम आटपून पिंपरी खंदारे गावाकडे जात होते.तर मेहकरवरून जालन्याकडे जाणाऱ्या एमएच 12 टीव्ही 2067 या क्रमांकाच्या ट्रकने चिखल्या फाट्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पिंपरी खंदारे येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना कळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करुन ट्राफिक सुरळीत केली.अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी सांगितले.वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.