४७ हजार रुपयाचे साहित्य अज्ञात आरोपीने केले लंपास
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पासून जवळ असलेल्या ग्राम बेलगाव येथे महादाजी दर्याजी पाटील माध्यमिक विद्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलीसांनाकडू मिळालेल्या माहितीनुसार महादाजी दर्याची पाटील माध्यमिक विद्यालयातील ऑफिस मधील हिंक व्हिजक कंपनीचे डी.वी.आर कीमंत २० हजार रुपये डेल कंपनी सी.पी ओ.किंमत १२ हजार रुपये. शालेय रेकॉर्ड व इतर साहित्य असा एकूण ४७ हजार रुपयांच्या आल अज्ञात आरोपीने लंपास केलेला आहे.
डोणगाव पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक दीपक प्रकाश कुटे यांच्या फिर्यादी वरून सदर अज्ञात आरोपी विरुद्ध अ.प.क. २४८. ४७/ ३८० कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश असपुंदे यांचा मार्गदर्शनात पो. हे कॉ. दिलीप राठोड करीत आहेत.