भारत मुक्ती मोर्चाचे भागवत जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनांद्वारे 6 ऑक्टोबर 2022 रोज बेझनबाक मैदान नागपूर येथे अकरा वाजता कार्यक्रम करून आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा धडकण्यात येणार आहे भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सदर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे
देशाचे संविधान बदलण्याचे षडयंत्र आर एस एस च्या मार्फत चालू आहे हरियाणा मधील डीएनए परिषद बेकायदेशीर प्रमाणे रोखण्यात आली आहे. बामसेफ संघटनेचे उत्तर प्रदेश राज्य अधिवेशन रोखण्यात येऊन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. संविधानाने देण्यात आलेल्या मूलभूत अधिकरांवर हा घाला आहे. ईव्हीएम मशीनच्या बरोबर पेपर ट्रेल मशीनची मोजणी न करता घोटाळा करून काँग्रेस भाजपा निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत याचा निषेध व जनजागृती ही रॅली येणार आहे. देशामध्ये बहुसंख्या समाज असलेल्या ओबीसीची जाती आधारित जनगणना न करण्याचा विरोधात. कामगार कायद्यात बदल करणे संविधानिक संस्थावर कब्जा कर रहे व वर्णव्यवस्थेनुसार नवीन संविधान निर्माण करण्याची भाषा बोलणे धर्म परिवर्तन मुस्लिमांच्या सह अन्य अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकतत्वाची योजना राबवण्याच्या विरोधात आर एस एस द्वारा आदिवासींचे जबरदस्तीने हिंदूकरण करण्याच्या विरोधात आर एस एस द्वारा ओबीसीचे जबरदस्तीने हिंदूकरण करण्याच्या विरोधात आरक्षण द्वारा बौद्ध विचारशक्ती वर कब्जा करणे तथा विद्रूपीकरण करणे इंद्रकुमार मेघालयाच्या हत्येच्या विरोधात कर्नल पुरोहित आणि प्रतिज्ञा सिंग ठाकूर यासारख्या आतंकवादी व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या विरोधात बिल्किस मानव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपीची खुल्या सुटका करण्याचा विरोधात. वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व डॉक्टर विशाल खरातयांचा फोन टायपिंगच्या विरोधात ही विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यात उद्घाटन म्हणून न्यायमूर्ती वीरेंद्र यादव. माजी न्यायमूर्ती इलाहाबाद तर प्रमुख उपस्थिती म्हणून भन्ते हर्षबोधी ब सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशा या प्रमुख मागण्यांसाठी हा विशाल मोर्चा व रॉली थेट नागपूर येथील आर एस एसच्या कार्यावर धडकणार असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत जाधव यांनी डोणगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
सदर पत्रकार परिषदेमध्ये जि.अ.मुक्ती मोर्चा ता. संयोजक भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष. चक्रवती अशोक सेवा संघ राज्य उपाध्यक्ष रा. लिंगायत मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा सहयोग संयोजक रिफाईन खोबाकडे. ता संयोजक युवा मोर्चा ता प्र. च.स.अशोक सेवा संघ यांनी पाठिंबा दर्शविला आहे.