Buldhana,डोणगाव मधील NA एन ए ले आउट मधील प्लॉट विकत घेता तर थांबा पहिले हे बघा..? - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, July 23, 2023

Buldhana,डोणगाव मधील NA एन ए ले आउट मधील प्लॉट विकत घेता तर थांबा पहिले हे बघा..?

                                       
                                                                डोणगाव झाले चिखल मय

एन ए ले आऊट वाल्यांनी  ग्राहकाची व शासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार...

बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले डोणगाव हे जिल्हा भरातच प्रसिद्ध आहे.मात्र आता पावसाळ्याच्या दिवसात डोणगाव हे चिखल मय झाल्याचा प्रकार दिसून येत आहे येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल बे हाल व आरोग्य सुद्धा धोक्यात दिसून येत आहे. पाई पाई जोडून कबाड कष्ट करून आपले भविष्य विकत घेतले  मात्र त्याचे सार्थक झालाच नाही नागरिकांच्या मनात मोठी खंत सदर लेआउट धारकांनी शासनाची व ग्राहकाची दिशाभूल केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे काय म्हटले वार्ड क्रमांक दोन मधील समस्या. 

डोणगाव झाले चिखल मय... एन ए ले आऊट मध्ये प्लांट घेत आहात तर थांबा हे बघा...videos?

ले आऊट मालक तर ले आऊट विकुन मोकळा झाला मात्र प्लाट धारकांचे काय. शासनाचा नियम नुकसान एन ए ले आऊट मधील रस्ते पंक्या सोरुपारत असने आवश्यक आहे. नाल्या विद्युत पाणी निचरन व्यवस्था ह्या सर्व सुविधा ले आऊट मध्ये देणे बंधनकारक आहे. मात्र अस काही दिवस येत नाही. संबंधित लेआउट धारकाने ग्राहकाची व शासनाची दिशाभूल करण्याचे काम केलेले दिसून येत आहे. संबंधित लेआउट धारकावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे आता नागरिक बोलत आहेत.

आपला विदर्भ लाईव्ह कडून डोणगावकरांना आव्हान आपण जर आपलं भविष्य विकत घेत असाल म्हणजेच आपण कबाड कष्ट  करून पायी पायी जोडून जर एखाद्या लेआउट मध्ये प्लॉट विकत घेत असाल तर त्या लेआउट मध्ये खरंच सुविधा आहेत का हे नक्की बघा जसं की डांबरी रस्ते सिमेंट नाल्या विद्युत  पाणी निचरन व्यवस्था सह संपूर्ण व्यवस्था आहेत का नंतरच खरेदी करा जागो ग्राहक जागो...

Post Top Ad

-->