महसूल विभागाकडून पंचनामा
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील भाग 2 मधील अहमद नगर येथील रहिवासी यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे यांचे जीवन आवश्यक वस्तू सह 32 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र. महसूल विभागाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामा
डोणगाव झाले चिखल मय...* *एन ए ले आऊट मध्ये प्लांट घेत आहात तर थांबा हे बघा..videos ?*
डोणगाव मध्ये अनेक धन दांड्यांनी खाजगी एन ए नुसार लेआउट टाकून आपला व्यवसाय थाडला आहे. शासनाच्या नियमानुसार एन ए ले आऊट मध्ये पक्के रस्ते पक्क्या नाल्या विद्युत पाणी निचरण व अनेक सुविधा द्यावे लागतात मात्र या नियमाला डावलून एन ए ले आऊट धारकांनी मनमानी कारभार करून ग्राहकांची व शासनाची दिशाभूल करत लेआउट मधील सर्वच प्लॉट विकून अनेक वर्षे झाले तरी सुद्धा रस्ते नाल्या विद्युत पाणी निचरन व्यवस्था सह काहीच सुविधा नसून प्लॉट धारकांना वाऱ्यावर सोडण्याचे एकंदरीत चित्र आहे मागील काही दिवसापासून संततधार पावसामुळे नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी रस्ता नसून त्रस्त आहेत तर सततच्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवन आवश्यक वस्तूंचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे महसूल विभागातील तलाठी यांच्या पंचनामा नमूद केले आहे.
सविस्तर असे नागपूर ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या डोणगाव ते मेहकर या महामार्गावरून हाकेच्या अंतरावर असलेले डोणगाव येथील भाग दोन येथील राष्ट्रीय महामार्गावरून हकेच्या अंतरावर एन ए झालेल्या ले आऊट मधील नागरिकांचे घरामध्ये दिनांक 22/07/ 2023 रोजी झालेल्या पावसामुळे पाणी शिरल्यामुळे गोरगरीब लोकांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
मन्नान शहा कटू शहा शेख सलीम शेख सयाजी बागवान शेख सलीम शेख नजीर शेख आसिफ शेख नजीर शेख अलीम शेख पासून शेख वसीम शेख सयाजी शेख आसिफ शेख मन्नान बागवान तसलीम गवळी छोटू गवळी शेख शकील शेख मोहम्मद शेख बागवान हे सर्व राहणार डोणगाव येथील असून त्यांचे अंदाजे नुकसान 32 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसानामध्ये अन्नधान्यांचे गव्हाचे कट्टे तांदूळ जीवनावश्यक वस्तू आदींचा समावेश आहे व तसेच शेख वसीम शेख सयाजी बागवान यांच्या कोंबडीचे पिल्ले छोटे व मोठे एकूण 25 वाहून गेले त्यामुळे त्यांचे अंदाजे नुकसान 12500 झाले आहे. सदर एकूण नुकसान 23 हजार रुपये एवढे झाले असून सदर लेआउट धारकांनी ग्राहकांची व शासनाची दिशाभूल करून लेआउट मध्ये कुठल्याच प्रकारच्या सुविधा न देत वाऱ्यावर सोडण्याचे चित्र आहे डोणगाव या ठिकाणी दिसून येत असून सदर नागरिकांच्या मनात ले आऊट धारकां विषयी असंतोष दिसून आला.