199 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 39 पॉझिटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, August 19, 2020

199 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 39 पॉझिटिव्ह

199 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 39 पॉझिटिव्ह


45 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 238 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 199 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 33 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 117 तर रॅपिड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 199 अहवाल निगेटीव्ह आहेत.


     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2, परदेशीपुरा 1, नगर परीषदेच्या मागे 1, जुनागांव 1, विष्णूवाडी 1,  शेगांव : मिलींद नगर 1, धनोकार नगर 3, माळीपुरा 1, जलंब ता. शेगांव : 1, चिखली : 1, मेहकर : 1, नांदुरा : 1, अमडापूर ता. चिखली : 1, सोनेवाडी ता. चिखली : 1, सुलतानपूर ता. लोणार : 2, अंजनी खु ता. मेहकर : 1, दे.राजा : 1, सिवील कॉलनी 1, लोणार : 1, मेरा बु. ता. चिखली : 1, निमखेड ता. जळगांव जामोद : 2, खामगांव : सती फैल 1, वाडी 9, सुदर्शन नगर 1, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, तेल्हारा ता. खामगांव : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39  रूग्ण आढळले आहे.  तसेच आज परदेशीपुरा बुलडाणा येथील 77 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


      तसेच आज 45 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.


सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 1, जाफ्राबाद रोड 3, दत्तापूर ता. बुलडाणा : 1, मलकापूर : 1, भोगावती ता. चिखली : 2, दाताळा ता. मलकापूर : 3, शेगांव : ओमनगर 3, लखपती गल्ली 2, तीन पुतळ्याजवळ 1,  मेहकर : 3, विठ्ठल नगर 2, स्टेट बँक जवळ 1, मँगो हॉस्टेल मागे 1, संताजी नगर 1, डोणगांव रोड 3,  वडशिंगी ता. जळगांव 1,   आडोळ बु. ता. जळगांव जामोद : 4, खळेगांव ता. लोणार : 2, सुलतानपूर ता. लोणार : 4, दे.राजा : खडकपूरा 2, खामगांव : शिवाजी वेस 2, मेरा बु. ता. चिखली : 1, निमखेड ता. जळगांव जामोद 1.


   तसेच आजपर्यंत 14570 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1494 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1494  आहे.  आज रोजी 138 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14570 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2395 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1494 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 860 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Post Top Ad

-->