Lonar | भीषण अपघात; महिला मजुरांच्या ॲटोला कारची धडक, एक ठार तर आठ जखमी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, February 1, 2026

Lonar | भीषण अपघात; महिला मजुरांच्या ॲटोला कारची धडक, एक ठार तर आठ जखमी


 १ महिला ठार, ८ जण गंभीर जखमी

 (लोणार | प्रतिनिधी देवानंद सानप )

लोणार तालुक्यातील किनगावजटू ते मातमळ रस्त्यावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. नेटसेटच्या कामासाठी जात असलेल्या महिलामजूरांच्या ॲटोला भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रविवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास किनगावजटू येथून मातमळकडे जाणारा ॲटो (क्रमांक MH28 R 2211) सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर आला असता, सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक MH43 AF 5821) ॲटोला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर ॲटो पलटी झाल्याने त्यातील महिलामजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. या अपघातात जरीनाबी अय्युबशहा (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

                                                             जखमींची नावे

या अपघातात खालील जण गंभीर जखमी झाले आहेत :

रंजना परमेश्वर कास्तोडे (५३)

शांताबाई शेवाळे (४५)

कल्पना विठ्ठल जमधाडे (४०)

अलका मधुकर शेवाळे (४०)

लक्ष्मण बबन करवते (४५)

चंद्रभागा गजानन नागरे (४०)

राधा गजानन गायकवाड

ॲटोचालक आसिफ निंशालशहा (३०)अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेने सर्व जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिंवराखंड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Post Top Ad

-->