जिल्ह्यात 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर 25 जणांना सुट्टी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 20, 2020

जिल्ह्यात 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर 25 जणांना सुट्टी

 जिल्ह्यात 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर  25 जणांना सुट्टी


यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात गत 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 25 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आज (दि. 20) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 115 जणांमध्ये 75 पुरुष आणि 40 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरूष व 10 महिला, नेर शहरातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरूष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील नऊ पुरूष व तीन महिला, वणी तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व चार महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील 15 पुरूष व आठ महिला, दारव्हा शहरातील 13 पुरूष व एक महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व दोन महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील पाच पुरूष व पाच महिला, उमरखेड शहरातील सहा पुरूष एक महिला, घाटंजी शहरातील दोन महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला व किनवट शहरातील एक पुरूषाचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 681 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती तर 141 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2482 झाली आहे. यापैकी 1598 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 62 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 118 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 39241 नमुने पाठविले असून यापैकी 38794 प्राप्त तर 447 अप्राप्त आहेत. तसेच 36312 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 


Post Top Ad

-->