वाशिम पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हा संदेश देत व सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथम वृक्षारोपण करून नवनियुक्त ग्रामपंचायत प्रशासक म्हणून वाशिम येथील कर्तव्यदक्ष बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी वाशिम तालुक्यातील अनसिंग ग्राम पंचायतचा आज पदभार स्वीकारला.
प्रियंका गवळी यांच्या मातोश्री वैशाली हरिश्चंद्र गवळी त्यांच्या आज वाढदिवसाच्या अनुषगं!ने त्यांनी ग्राम पंचायत परिसरात ३५ झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हा संदेश देत अनसिंग गावास वृक्षारोपनाची प्रथम भेट दिली.. यावेळी मा.सरपंच सिंधुताई सातव, उपसरपंच शेख गफार हयात, सदस्य कुंडलिक ढगे, सदस्य गजानन वलेकर, ग्रामसेवक बोडके,व माधव ठाकरे यांची उपस्थिती होती उपस्थित होते..