जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक खोळंबली
(प्रतिनिधी विलास केजरकर ,भंडारा)
पुरग्रस्तांना सुरक्षित जागी हलविले
वैनगंगा तैराकी मंडळाने दिले पाच जनावरांना जिवनदान
शहर झाले जलमय
जिल्हा प्रशासनाने दिला नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दोन दिवसांपासुन सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच संजय सरोवरातील पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पात्राबाहेर पाणी वाहत असून कारधा येथील वैनगंगा नदीवरील लहान पुलावरून चार फूट पाणी वाहत आहे. यामुळे वाहतूक तीन दिवसापासून खोळंबली आहे. तसेच भंडारा शहरातील ग्रामसेवक काँलोनी, काही भागात वैनगंगा नदीचे बॅक वॉटर आल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत.
तर नदीच्या पात्रातून नदी पाच जनावरे पुराच्या पाण्यात वाहत असतांना कारधा येथील वैनगंगा तैराकी मंडळाने त्या वाहत असलेल्या जनावरांना आवाजाच्या सहाय्याने मदत केल्याने त्यांचा जीव वाचविण्यास यश आले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येकांची मदत केली तर पुरातून कोणतीलीही जीवित हानी होणार नाही.असे मत वैनगंगा तैराकी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. तसेच भंडारा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर , बीटीबी सब्जी मार्केट , महिला रुग्णालय, भोजापूर, ग्रामसेवक कॉलनी , गणेशपूर येथे पाणी आल्याने संपूर्ण परिसर जलमय झाले आहे.तसेच तुमसर मार्गावर करचखेडा , खमारी बुट्टी या मार्गावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक खोळबली आहे . तर हजारो एकर धान पीक पाण्याखाली आलेला आहे . तसेच अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने त्यांना जिल्हा परिषद शाळा, बसस्थानकात सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. त्यासाठी ग्राम पंचायत सरपंच, तलाठी, पोलीस पाटील व जिल्हा प्रशासन प्रयत्न करित असून पुराची पातळी वाढणार असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.