राज्य आपत्ती प्रतिसाद दल जिल्ह्यात दाखल
भंडारा,दि. 21 - राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीमचे 25 सदस्य भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीची हाताळणी करिता संपूर्ण साहित्यासह आज भंडारा येथे दाखल झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन भंडारा सह बचावाचे, जनजागृती चे कार्य सुरु केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उप निरीक्षक एस. एस. जंबेली, पोलीस उप निरीक्षक एम. एल. मोर्ला यांचेसह राज्य आपत्ती प्रतिसाद दलात 25 सदस्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उप जिल्हाधिकारी शिवराज पडोळे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांच्या मार्गदर्शनात हे कार्यरत झाले आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलास शोध व बचाव कार्यास व कोविड -19 सुरक्षा संबंधी उपाययोजना करिता जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
लाखनी आणि भंडारा येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरची टीम पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहे. तात्काळ मदतीसाठी हे दल सज्ज ठेवण्यात आले आहे.