गणपतीचा जयजयकार मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने गणरायाची मनोभावे पूजा आणि आरती केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले.
बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट दूर होऊ दे असे साकडे गणरायाला घातले.
राज्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.