अंढेरा लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.23: जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरलेआहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. पलढग प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत साठा 7.51 दलघमी असून पुर्ण संचय पातळी 403.20 मीटर आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा प्रकल्पाचा संकल्पीत साठा 33.93 दलघमी आहे, तर पुर्ण संचय पातळी 404.90 मीटर आहे. हा प्रकल्पही पुर्ण क्षमतेना भरला असून सांडवा प्रवाहीत झाला आहे. तसेच दे. राजा तालुक्यातील अंढेरा हा लघु पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी 6 वाजता 100 टक्के भरला आहे.
सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत येत असलेला ज्ञानगंगा 100 टक्के भरला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पुर्ण भरून सांडवा प्रवाहीत होवू शकतो. हीच परिस्थिती पलढग प्रकल्पाची सुद्धा आहे. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पूर येण्याची शक्यता आहे. ज्ञानगंगा नदीकाठावरील 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, सारोळा, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिं. राजा, घाणेगांव, ज्ञानगंगापूर, दौडवाडा, नांदुरा तालुक्यातील वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव आणि शेगांव तालुक्यातील डोलारखेड व वरध गावांचा समावेश आहे. असे शाखा अभियंता, सिंचन शाखा, तांदुळवाडी यांनी कळविले आहे.