बिबट्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे
जिल्हा प्रतिनिधि विलास केजरकर
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवळच्या भुसारी टोला येथील 26 वर्षीय युवकाच्या डोक्यावर बिबट्या वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश्वर काशीराम वलके वय 26 वर्षे हा नेहमीप्रमाणे गावातील हनुमान मंदिराजवळ गावकऱ्यांसह चर्चा करीत असतांना अचानक बिबट्याने गावात प्रवेश केला . हनुमान मंदिराजवळ पोहोचताच बिबट्याने ज्ञानेश्वर वर हल्ला केला . यात ज्ञानेश्वर हा जखमी झाला असून त्याला त्याच अवस्थेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गंभीर प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाथ दाखल करण्यात आले आहे . उपचारानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते
दुसरीकडे वन विभाग, प्रादेशिक नवेगावबांध यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी भुसारी टोला गावाला भेट रात्रीला गस्त करण्यात सुरुवात केली असून भुसारी टोला या गावात बिबट्याची दहशत पसरल आहे. वन विभागाने जखमीला आर्थिक मदत देऊन बिबट्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे