बाप्पा पावला उद्यापासून लाल्परी चालू होणार
-दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लॉकडाउनमध्ये एसटीची अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतूकीला परवानगी दिली होती.
तालुका ते गाव ते तालुका-जिल्हा सुरु असणारी एसटी आता जिल्ह्याच्या बाहेरही धावणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक खासगी वाहणांनी सर्वसामान्य प्रवाशांची लुटमार झाली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे याला आता आळा बसेल.