अकोला जिल्ह्यात ३० पॉझिटीव्ह तर १०८ निगेटीव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, August 11, 2020

अकोला जिल्ह्यात ३० पॉझिटीव्ह तर १०८ निगेटीव्ह

 अकोला जिल्ह्यात  ३० पॉझिटीव्ह  तर १०८ निगेटीव्ह


आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १६ महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व  पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित शिवर, सीएस ऑफीस, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगा नगर, बायपास, जूने शहर अकोला येथील ५१ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



आता सद्यस्थिती


एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६०७+४९०=३०९७

मयत-११७, डिस्चार्ज- २४२५

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५५५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


घरीच रहा, सुरक्षित रहा!

Post Top Ad

-->