यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यात गत 24 तासात 16 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून नव्याने 126 रुग्णांची भर पडली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 190 ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या 16 जणांमध्ये यवतमाळ शहरातील सात पुरुष (वय 43, 64, 52, 59, 39, 67, 64) व 57 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 58 व 47 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 48 वर्षीय व तालुक्यातील 24 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 70 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 61 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 126 जणांमध्ये 70 पुरुष व 56 महिला आहेत. यात आर्णी शहरातील सहा पुरुष व तीन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, घाटंजी शहरातील एक पुरुष व एक महिला, जिल्ह्यातील एक महिला, महागाव शहरातील तीन महिला, मानोरा येथील एक पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच पुरुष व चार महिला, पुसद शहरातील 15 पुरुष व नऊ महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील 11 पुरुष व चार महिला, वणी शहरातील पाच पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 18 पुरुष व 16 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व झरीजामणी शहरातील एक महिलेचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 586 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 457 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7288 झाली आहे. यापैकी 6025 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 220 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 256 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 67971 नमुने पाठविले असून यापैकी 66716 प्राप्त तर 1255 अप्राप्त आहेत. तसेच 59392 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.