तीन लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो ! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 21, 2020

तीन लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो !


नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पांतून विसर्ग सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे.  आज 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील दोन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामध्ये सिं. राजा तालुक्यातील तांदुळवाडी व खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी, जनुना या प्रकल्पांचा समावेश आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 वक्रद्वारे 30 से.मी ने उघडण्यात आली असून खडकपूर्णा नदीपात्रात 22 हजार 550 क्युसेक (638 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारे 30 से. मी उघडून नदीपात्रात 10016 क्युसेक (283.65 क्युमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. मस या मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून 60 से.मी उंचीवरून 84.22 क्युमेक प्रति सेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदी पात्राशेजारील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तांदूळवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने 100 टक्के भरल्यामुळे तांदुळवाडी – महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन ता. सिं. राजा या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरला आहे. त्यामुळे पिंप्री गवळी, कोलोरी ता. खामगांव व शेगांव तालुक्यातील जवळा बु, वरूड, गव्हाण या गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी दिला आहे.

आतापर्यंत 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प

जिल्ह्यात एकूण 81 लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. यावर्षी असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत 64 प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले आहे. 100 टक्के भरलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे : शेकापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगांव, करडी, मासरूळ ता. बुलडाणा, अंचरवाडी 2, पिंपळगांव चिलम, अंचरवाडी 1, मेंढगांव,  सावखेड भोई, शिवणी आरमाळ, अंढेरा  ता. दे. राजा, मांडवा, तांदुळवाडी, केशव शिवणी, जागदरी, पिंपरखेड, विद्रुपा, गारखेड  ता. सिं. राजा,  ढोरपगांव, हिवरखेड 1, हिवरखेड 3, टाकळी, पिंप्री गवळी, निमखेड, गणेशपूर, रायधर, जनुना ता. खामगांव, चोरपांग्रा, पिंपळनेर, खंडाळा, तांबोळा, दे. कुंडपाळ, गुंधा, गांधारी, शिवणी जाट, टिटवी, हिरडव  ता. लोणार, चिखली, फत्तेपूर, पाटोदा, कटवडा, कव्हळा, तेल्हारा, ब्राह्मणवाडा, मिसाळवाडी, हराळखेड ता. चिखली, पिं. नाथ ता. मोताळा, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर, सावंगी माळी 1, पळशी, कळपविहीर, पांगरखेड, कळमेश्वर  ता. मेहकर, गोराडा, राजुरा ता. जळगांव जामोद, धा. बढे ता. मोताळा,

Post Top Ad

-->