· माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम
· 2 लाख 85 हजार कुटुंबाची तपासणी
· मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
भंडारा दि.21 : प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्हयात राबविण्यात येत असून या मोहिमेत 861 आरोग्य पथक घरोघरी जाऊन आरोग्य जागृती करणार आहेत. जिल्हयातील लोकसंख्या 12 लाख 18 हजार 211 असून 2 लाख 85 हजार 414 कुटुंबांना भेटी देऊन ही पथक वैयक्तिक, कौटुबिक व सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबतची ही त्रिसुत्री आवश्यक असल्याचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून देणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी" कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहिम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर व डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते. पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 22 दिवस व दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोंबर 12 दिवस अशा दोन टप्यात ही मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मोहिम राबविण्यासाठी ग्रामीण भागासाठी 790 तर शहरी भागासाठी 71 पथके तयार करण्यात आले आहे. एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे एकूण तीन व्यक्तीचा पथकात समावेश आहे. ही पथक घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची कामे करणार आहेत. ही माहिती शासनाच्या मोबाईल अॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. या बाबतचे प्रशिक्षण टिम सदस्यांना देण्यात आले आहे. जिल्हयात ही मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्यादृष्टिने पाच ते दहा टिमच्या मागे स्थानिकस्तरावर पर्यवेक्षकाची नेमनुक करण्यात आली आहे. शिवाय मोहिमेचे जिल्हास्तरावरून सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्याकरीता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp०२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेईल. ताप, खोकला, दम लागणे, Sp०२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोविड -19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील. कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भित केले जाईल. प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा दिली जाईल . घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समाजवून सांगितले जातील. लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. "माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम कोवीड -19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयीत कोवीड -19 रुग्ण, व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळतील याची दक्षता घेतीलार्वताली जाणार आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट- गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार, अति जोखमीचे (Co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड -19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली (SARI-ILI) रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोवीड-19 तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविड -19 बाबत आरोग्य शिक्षण. या मोहिमेत भाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व आरोग्य शिक्षण संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मोठया प्रमाणात रोख रकमेचे बक्षिस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत बक्षिस मिळालेल्या व्यक्ती व संस्थांना जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या हस्ते तर राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिस देण्यात येणार आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून कोविडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले .