सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी, 69.6 मि.मी पाऊस दोन तालुक्यांनी पर्जन्यमानाची गाठली शंभरी
बुलडाणा, (जिमाका) दि.21 : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून आले आहे. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पीकांचे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने शेतात पाणी थांबल्यामुळे कापूस पीकावरही विपरीत परीणाम होत आहे. जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त 69.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून ही अतिवृष्टी आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 29.1 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मलकापूर तालुक्यात 103.58 टक्के व सिंदखेड राजा तालुक्यात 102 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यांनी पावसाची शंभरी गाठली पाच तालुके नव्वदीच्या पार आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 27.6 मि.मी (805.6), चिखली : 20.1 (772), दे.राजा : 20.2 (658.6), सिं. राजा : 69.6 (817.9), लोणार : 33.2 (598.2), मेहकर : 42.2 (713.8), खामगांव :28.5 (553.9), शेगांव : 18.1 (550.8), मलकापूर : 20.5 (731), नांदुरा : 27.1 (710), मोताळा : 11.7 (447.4), संग्रामपूर : 55.3 (758.3), जळगांव जामोद : 4.8 (612)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8729.5 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 671.5 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 447.4 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 62.80 आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 56.44 दलघमी (81.42), पेनटाकळी :58.92 दलघमी (98.25), खडकपूर्णा :86.43 दलघमी (92.54), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.75), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 7.89 दलघमी (100) व उतावळी : 19.79 दलघमी (100).