कोरोनाच्या चाचण्या वाढवून संसर्गावर नियंत्रण मिळवावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, September 2, 2020

कोरोनाच्या चाचण्या वाढवून संसर्गावर नियंत्रण मिळवावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


कोरोना संसर्ग आढावा बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.2 :   कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील  कोरोना निदान चाचण्यांचा वेग वाढविला पाहिजे. रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या कराव्यात. कोरोनाच्या चाचण्या वाढवून संसर्गावर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.


 जिल्हा सामान्य रूग्णालयात  जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या दालनात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलिप पाटील- भुजबळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


  कोविड रूग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, लॅबची यंत्रसामुग्री अद्ययावत असावी. त्वरीत प्रयोगशाळा सुरू करावी.  तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे  कोवीड रूग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावला असून तेथे पूर्ण स्टाफ उपलब्ध करून देण्यात आल आहे. जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढवून कोरोनावर कसे नियंत्रण ठेवता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली.  या संदर्भात लोकप्रतीनिधी व तज्ज्ञांची लवकरच बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेण्यात यावे.  ऑक्सिजन टॅंक उभारणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री यांनी कोविड संदर्भात विविध अडचणी जाणून घेतल्या.

Post Top Ad

-->