नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशील्ड’ची मानवी चाचणी आता (Covishield Vaccine Human Testing In Nagpur) नागपुरात होणार आहे. नागपूरच्या मेडिकल शासकीय रुग्णालयाला त्याची परवानगी मिळाली आहे. ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी’, ‘ऍस्टेजेनका’, आणि पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन तयार केलेली आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या ‘कोविशील्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकल या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालया परवानगी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 100 व्यक्तींवर ही चाचणी केली जाणार असून पुढील आठवड्यापासून या चाचणीच्या रितसर नोंदणीला सुरुवात होणार आहे (Covishield Vaccine Human Testing In Nagpur).
भारतात तयार करण्यात येत असलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु झाला असताना आता ‘कोविशील्ड’ लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होणार असल्यानं नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवल्या जाणार आहे. कोरोनावरील लसनिर्मिती अंतिम टप्यात आहे. विशेषतः ‘कोविशील्ड’ लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.