नागपुरात बिअरबार लूटणाऱ्यांना अटक, पोलिसांनी आरोपींची काढली धिंड - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, September 24, 2020

नागपुरात बिअरबार लूटणाऱ्यांना अटक, पोलिसांनी आरोपींची काढली धिंड

 


नागपूर- धारधार शास्त्रांचा धाक दाखवून बिअरबार लुटणाऱ्या दरोडेखोरांची जरीपटका पोलिसांनी धिंड काढली आहे. काल रात्री या आरोपींनी एका बारमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

आज सकाळी या प्रकरणातील ६ आरोपींना पोलिसांनी खापरखेडा येथून अटक केल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत असताना त्यांची रस्त्यावर चक्क धिंड काढण्यात आली. नागरिकांच्या मनातील गुंडांची भिती घालवण्यासाठी पोलिसांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी नागपूर शहर गुन्हेशाखेनेसुद्धा कुख्यात गुंड संतोष आंबेकरची अशीच धिंड काढली होती.

नागपूर शहरात वाढत असलेली गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. ज्यावेळी गुन्हेगार पोलीस यंत्रणेला आवाहन देत असतात, त्या त्या वेळी अशा गुंड प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारचे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली, त्यांनी याआधीसुद्धा लूटमारीच्या दोन घटना केलेल्या आहेत. त्यांची दहशत वाढत असल्याने पोलिसांनी त्यांची अशी धिंड काढली.


Post Top Ad

-->