ज्यांच्या मालकीचा माल आहे, त्यांनी 7 दिवसाचे आत संपर्क करावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) बुलडाणा यांचे अखत्यारितील गुम्मी वर्तुळामध्ये गुम्मी बीट अंतर्गत कक्ष क्रमांक 344 बी साग वृक्षतोडीबाबत वनगुन्हा 10 मे 2020 रोजी कायम करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी राखीव वनात तुट झालेल्या मालाचा शोध घेत असताना चौकशीमध्ये धाड ते धामणगांव रस्त्याच्या बाजुने साखर कारखान्याचे फाट्या जवळ संशयास्पद सागवान गोल नग 11 सापडले आहेत. जप्त केलेले नग 1.197 घनमीटर असून त्याची किंमत 73 हजार 985 रूपये आहे. सदर जप्त करण्यात आलेला साग माल कोणाच्या मालकीचा असल्यास त्यांनी मालकी हक्काबाबत वैध दसतएवजासह वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालयात पुढील 7दिवसाचे आत सादर करावे, असे वनपरीक्षेत्र अधीकारी जी. पी टेकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.