विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : राज्यात 1 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 30 सप्टेंबर व 10 ऑक्टोंबर या तारखेस विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. संपर्कासाठी आगारांचे क्रमांक पुढीलप्रमाणे बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.
वृध्द कलावंतानी मानधनासाठी अर्ज सादर करावे ; 10 ऑक्टोंबर अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यातील सर्व संबंधित वृध्द कलावंताना शासन निर्णय दि. 7 फेब्रुवारी 2014 च्या अनुसरुन सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी लाभ मिळण्यासाठी आपल्या तालुक्याच्या संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यानी आपले परिपुर्ण अर्ज दि. 20 आक्टोबर 2020 पर्यत कार्यालयीन वेळेत संबंधित पंचायत समिती यांचेकडे सादर करावे.
यापुर्वी योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या आवश्यक त्या मुळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रांसह सादर केलेले फक्त वैध आणि योग्य अर्जच स्विकारले जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतीत असलेले अटी व शर्ती वाचुनच अर्ज करावे. मुदतीनंतर येणारे अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृध्द कलांवतांनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन जिल्हा वृध्द कलावंत मानधन सतिीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.