अमरावती : कोरोनाना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात बेड मिळत नसल्याने व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने अमरावती मधील एका कोरोना रुग्णाने चक्क जिल्हाधिकार्यालय गाठले असून तो जिल्हा दौऱ्यावर असलेले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्याची मागणी करत आहे. दरम्यान या कोरोणा रुग्णांला ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला आता सध्या तारेवरची कसरत करवी लागत आहे .
अमरावतीमधील एका व्यक्तीने आज कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याची आई-वडिलांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे. मात्र शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने त्या रुग्णाने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निकम यांच्याशी संपर्क केला ।परंतु कुठलाही प्रतिसाद त्या रुग्णाला भेटला नसल्याने अखेर त्या रुग्णाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे. आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे येणार आहे .काही वेळातच यांची पत्रकार परिषद येथे सुरू होणार आहे. तत्पूर्वी या कोरोणा रुग्णाने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव करून आरोग्यमंत्री यांना भेटण्याची मागणी करत असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली आहे.