खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास पाच पट दंड! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 25, 2020

खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास पाच पट दंड!


ऑक्सिजन खाटा वाढवणे आवश्यक

खासगी रुग्णालयांत करोना उपचारासाठी शासनाने नवे दर निश्चित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून जादा दर आकारल्यास त्या रुग्णालयांना पाच पट दंड ठोठावणे, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज गुरुवारी नागपुरात दिली.

विदर्भातील करोनाबाधितांचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

राजेश टोपे म्हणाले, खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासह महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. जर खासगी रुग्णालय रुग्णांकडून शासनाने निश्चित केल्याहून जास्त दर आकारत असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी रुग्णालयांनाही भेटी दिल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत राज्यात प्रतिदशलक्ष ४० हजार चाचण्या होत आहेत. चाचण्या वाढवल्याने करोना रुग्ण वाढतात. पण, मृत्यू वाढू नये. त्यासाठी ऑक्सिजन खाटा वाढवणे आवश्यक असल्याचेही टोपे म्हणाले.

Post Top Ad

-->