देशात गेल्या २४ तासांमध्ये ५५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर ७०६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, October 13, 2020

देशात गेल्या २४ तासांमध्ये ५५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर ७०६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू


 नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 55 हजार 342 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71 लाख 75 हजारांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 706 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 856 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 75 हजार 881 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 38 हजार 729 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 62 लाख 27 हजार 239 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 73 हजार 14 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 89 लाख, 45 हजार 107 एवढी झाली आहे.

Post Top Ad

-->