परतीच्या पावसाने संत्रा बागेचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, October 15, 2020

परतीच्या पावसाने संत्रा बागेचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

 वाशिम- गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस पडतोय. वाशीम जिल्ह्यातही तीन दिवसांपासून संसततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यातील मोरगव्हान,एकलासपूर,सह अनेक गावातील सततच्या पावसाने संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे

या संत्रा बागेतुन इथल्या शेतकऱ्यांना लाखों रुपयाचे उत्पन्न मिळणार होते मात्र पावसामुळे हातचे पीक गेल्याने फळबाग उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. दरम्यान कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी फळबाग उत्पादक शेतकरी करत आहेत. संततधार पावसामुळे असल्याने फळबाग सह सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलने देखील केली आहेत. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Top Ad

-->