(दि. ०१ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा वाशीम .) काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील ३, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, योजना पार्क येथील १, धुमका येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव शहरातील जाट गल्ली येथील १, इतर ठिकाणचे ३, अमानी येथील १, मैराळडोह येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, इतर ठिकाणचा १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, हराळ येथील १, जांब आढाव येथील १, कळंबा बोडखे येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील मोझरी येथील १, मानोरा शहरातील १, वसंतनगर येथील ४, कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव येथील १, भामदेवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.