महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपेंचं मोठं विधान MAHARASHTRA COVID-19 - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, February 17, 2021

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपेंचं मोठं विधान MAHARASHTRA COVID-19

 

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुंबईत पुन्हा करोना संकट; चेंबूरमध्ये लॉकडाउन?

“स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर करोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?

पुढेते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.

“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे करोना रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच,” यावर राजेश टोपे यांनी जोर दिला.

कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

Post Top Ad

-->