बुलडाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे
जिल्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून बुलडाणा शहरा नजीक असलेल्या तांदुळवाडी
येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे
गुरुवारी सकाळपासूनच जिल्यात ढगाळ वातावरण होते . त्यातच सकाळी ११ वाजेच्या सुमारास बुलडाणा तालुक्यासह
परिसरात पावसाने हजेरी लावली जवळपास तासभर हा अवकाळी पाऊस पडत होता याच गाळात वीजांचाही गडगडाट
मोठ्या प्रमाणावर होता. त्यातच तांदुळवाडी येथील एका वृध्दांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे
सध्याही जिल्यातील काही भागात पावसाची संततधार सुरु आहे . प्रामुख्याने
जिल्हामुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरासह तालुक्यात या पावसाचा जोर अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे