भुयार येथील शिवजयंती कार्यक्रमात प्रतिपादन
स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठून मोगलांची सत्ता हाणून पाडली. गनिमीकाव्याने अफजलखानसारख्या मोगलo सम्राटाचा वध करतांना रयतेचे हित बाळगले. त्यांनी जातीपातीची तुलना न करता सर्वसमावेशक स्वराज्याची कल्पना केली. महिलांचे रक्षण देखील शिवाजी महाराजांनी केले असून जाती धर्माचा त्यांनी विरोध केला नाही. हिंदू-मुसलमान असा भेद देखील त्यांनी केला नाही. प्रत्येकाने त्याच्या जीवनाचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजींचे विचार डोक्यात घ्यावे असे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले. ते भुयार येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ निलेश जसुदकर. पत्रकार मनोहर मेश्राम. प्रदिप घाडगे आशा वर्कर यांना सुध्दा कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले.शिवाजी मित्र मंडळ भुयार च्या वतीने.
शिवाजी मित्र मंडळ भुयार द्वारा आयोजित शिवजयंती कार्यक्रमाचे उद्घाटन होले साहेब मानस ऍग्रो कंपनी कोलारी यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मोहन पंचभाई यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं. स . सदस्य शैलेश मयूर,माजी जि. प. सदस्य तथा कांग्रेस तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, भगवान नवघरे, बंडू पंडे, संपादक मनोहर मेश्राम, संपादक प्रदीप घाडगे, रामकृष्ण रामटेके, प्रशिक मयूर इत्यादी उपस्थित होते. दरम्यान मंडळातर्फे कोरोना यौद्धा पुरस्काराने महिला व पुरुषांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात शंकरराव तेलमासरे, शैलेश मयुर, मनोहर मेश्राम, प्रदीप घाडगे, भगवान नवघरे, श्री भोयर इत्यादींची समयोचित भाषणे झाली. रात्रीला समाज प्रबोधनाच्या दृष्टीने 13 वर्षीय कीर्तनकार तुळशी यशवंत हिवरे यांचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन पत्रकार मनोज चिचघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघराज जोगवे जवान, बंटी गजभिये, उमेश बाळबुद्धे, सुभाष चूधरी, अरविंद बालबुद्धे, नरेश मेश्राम, तुषार गजभिये, अमोल आठमांडे, मोगल लिंगायत, किशोर आठमांडे, फिरोज अलोने, सुभाष चूधरी, दिनेश हिंगणकर, शुभम मेश्राम, गुड्डू कोसरे, गुड्डू झोडे यांनी अथक परिश्रम घेतले.