(छायाचित्रे संग्रहित)
दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे अंगावार वीज पडून 5 लहान मुलं गंभीर जखमी
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे अंगावार वीज पडून 5 लहान मुलं गंभीर जखमी झालीयेत. ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे झाडाखाली थांबल्यानंतर मंगळवारी (23 मार्च) ही दुर्दैवी घटना घडली. पाचही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुलं झाडाखाळी थांबली आणि वीज कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे पाच लहान मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस सुरु असल्यामुळे अंग भिजू नये म्हणून ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. राम भट, आहु शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे, मंगेश टाले असे जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत.
दरम्यान घटनेची माहिती होताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे धाव घेतली. या मुलांना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या पाचही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठीशी, मदतीसाठी कटिबद्ध-
मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता मार्चमध्ये परत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. चार महिन्यांत तिसऱ्यांदा हा तडाखा बसला. म्हणजे अवकाळी आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी हे दर महिन्याचे संकट झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास सामना अग्रलेखातून देण्यात आलाय.