(छायाचित्रे संग्रहित)
महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांत नवीन कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ नोंदवली जात आहे. नवीन प्रकरणांपैकी 79.57% रुग्ण या सहा राज्यातले आहेत. गेल्या 24 तासांत 62,258 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन नवीन रुग्णांची 36,902 नोंद झाली आहे. त्याखालोखाल पंजाबमध्ये 3,122 तर छत्तीसगडमध्ये 2,665. नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. हिंदुस्थानातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 4,52,647 वर पोहोचली आहे. हिंदुस्थानच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.8% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येचा विचार करता 31,581 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ व पंजाब या राज्यांमधे 73% रुग्ण आहेत.