माहेरकडून जमीन मिळाली, तरीही वाद, मुलीने आईला दगडावर आपटून मारलं!(Akola-mother daughter kills) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, March 12, 2021

माहेरकडून जमीन मिळाली, तरीही वाद, मुलीने आईला दगडावर आपटून मारलं!(Akola-mother daughter kills)

(छायाचित्रे संग्रहित) 

 अकोला : अकोल्यात आईची हत्या केल्याप्रकरणी मुलीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून सख्ख्या मुलीनेच आपल्या आईला संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. माहेरकडून जमीन मिळाल्यानंतरही आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाला. अखेर मुलीने आईला दगडावर आपटून मारलं. (Akola Daughter Kills Mother over Land Financial Transaction)

सरुबाई काशीनाथ कांडेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी सरुबाई यांची मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. आणि हत्येचं गुपित उघडं पडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आई पडल्याचा बनाव

अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरात काल हे हत्याकांड घडलं. या प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुलीने आपल्या आईच्या हत्येची कबुली दिली. सुरुवातीला आई पडली आणि तिच्या डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला, असा बनाव कविताने केला होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने आईच्या हत्येची कबुली दिली.

सात गुंठे अधिक जमीन मिळूनही असमाधानी

तीन मुलीच असल्याने आईने तिघींच्याही नावाने शेतीवाडी आणि इतर प्रॉपर्टी करून दिली होती. कविताला सात गुंठे जमीन अधिक देण्यात आली होती. ते गुंठे कविताने विकल्यानंतर आईने तिला त्यातील एक लाख रुपये मागितले. पैसे देण्याच्या कारणावरुन कविता आणि आईमध्ये वाद झाला. त्यानंतर कविताने आईला दगडावर आपटून तिचा खून केला.

Post Top Ad

-->