डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
वनाधिकारी रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मा.मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री म्हणाल्या की,राज्यातल्या आयाबहिणींना त्रास देणाऱ्या रोड रोमीयो बरोबरच सरकारी तसंच खाजगी कार्यालयांमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आहे. या राज्यात अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना शिक्षा मिळेल, कडक शिक्षा मिळेल. सगळ्या कार्यालयांमधल्या विशाखा समित्यांचा आढावा आम्ही घेणार आहोत. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही.
हा जिजाऊॅचा महाराष्ट्र आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. माझी विनंती आहे राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात घ्यायची भाषा बोलतायत, लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा एकेकाला.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. त्यांनी स्वत:ला संपवलं, त्यांची आत्महत्या दुःखदायक आहे. या निमित्ताने मी राज्यातील आईबहिणींना वचन देऊ इच्छिते की लैंगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल. हेच माझं वचन आहे.
एकालाही सोडणार नाही, कुणाला त्रास असेल अशा महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहे.
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर अमरावती