करोनाचा कहर : ६,४१४ चाचण्यांमध्ये १,३३८ करोनाग्रस्त (Nagpur -covid) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 10, 2021

करोनाचा कहर : ६,४१४ चाचण्यांमध्ये १,३३८ करोनाग्रस्त (Nagpur -covid)

(छायाचित्रे संग्रहित)

 नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १ हजार ३३८ नवीन रुग्णांची भर पडली. सोमवारी शहरात केवळ ६ हजार ४१४ चाचण्या झाल्या होत्या. त्यात तेराशेहून अधिक बाधित आढळल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण तब्बल २०.८६ टक्के आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी शहरात ७ हजार २७८, ग्रामीण ३ हजार १९८  चाचण्या झाल्या. यापैकी बहुतांश चाचण्यांचा अहवाल दुसऱ्या दिवशी येतो. त्यानुसार सोमवारच्या कमी चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात शहरात १ हजार ४९, ग्रामीण २८६, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे जिल्ह्य़ात नवीन १ हजार ३३८ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख २७ हजार ९२८, ग्रामीण ३१ हजार ४४८, जिल्ह्य़ाबाहेरील ९६७ अशी एकूण १ लाख ६० हजार ३४३ रुग्णांवर पोहोचली आहे. २४ तासांत शहरात १, ग्रामीण २, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ६ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८३८, ग्रामीण ७८४, जिल्ह्य़ाबाहेरील ७८५ अशी एकूण  ४ हजार ४०७ रुग्णांवर पोहोचली आहे.

९९७ व्यक्ती करोनामुक्त

शहरात दिवसभऱ्यात ७१३, ग्रामीणला २८४ असे एकूण ९९७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख १६ हजार ६३०, ग्रामीण २७ हजार ८९५ अशी एकूण १ लाख ४४ हजार ५२५ व्यक्तींवर पोहोचली.  करोनामुक्तांचे प्रमाण घसरुन ९०.१३ टक्क्यांवर आले आहे.

८१ टक्के रुग्ण शहरातील

एकूण रुग्णांतील ८०.६४ टक्के म्हणजेच ९ हजार २०२ रुग्ण शहरात आहेत. ग्रामीणला २ हजार २०९ असे एकूण ११ हजार ४११ सक्रिय   रुग्ण आहेत. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांपैकी ८ हजार ३७२ रुग्णांवर गृह विलगीकरणात  तर १ हजार ७०१ गंभीर  रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

शहरातील ४० वर अपार्टमेंट प्रतिबंधित 

विविध झोनमधील ४० पेक्षा अधिक अपार्टमेंट व सदनिका प्रकल्प प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या ठिकाणी ५ पेक्षा अधिक  रुग्ण  आहेत. त्यात  रामनगर, लक्ष्मीनगर, रामदासपेठ, नंदनवन, प्रतापनगर, सदर, जाफरनगर, रेशीमबाग, धंतोली, महाल, वर्धमाननगर, देशपांडे लेआऊट, वाठोडा या भागातील अपार्टमेंटचा समावेश आहे. ज्या भागात पूर्वी  रुग्ण नव्हते अशा धरमपेठ, समर्थनगर, सुर्वेनगर,  रेशीमबाग, महाल, शिवाजीनगर, भरतनगर, माधवनगर, रामदासपेठ, फ्रेंड्स कॉलनी, प्रतापनगर, हिंदुस्थान कॉलनी, समर्थनगर, गोकुळपेठ, क्वेटा कॉलनी, वायुसेना नगर, देशपांडे लेआऊट अशा काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्ण आढळत आहेत. गेल्या वीस दिवसात महाल परिसरात ९०  रुग्ण आढळून आले.

Post Top Ad

-->