मोठी बातमी! नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर(Nagpur Lockdown) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 11, 2021

मोठी बातमी! नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर(Nagpur Lockdown)

 

(छायाचित्रे संग्रहित)

नागपूर : नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येवरुन प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Lockdown In Nagpur From 15 March To 21st March 2021)

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीनंतर नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाऊन काळात नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढताना दिसतो आहे. बुधवारी नागपुरात एकाच दिवसात १७१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. नागपूर शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,६१,०५३ झाली असून आज ८ रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या ४४१५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, बुधवारी १०५४८ चाचण्या झाल्या. त्या तुलेनत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १६.२१ टक्के झाले आहे.


Post Top Ad

-->