(छायाचित्रे संग्रहित)
नागपूरामधील मानकापूर भागातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच अजनी भागात सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर गावगुंडांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घडली आहे. नागपूर अजनी वसंतनगर भागात मंगळवारी पीडित विद्यार्थीनीवर गुडांनी अत्याचार केले. याप्रकरणी चार गावगुडांविरोधात अजनी पोलीस स्थानकात सामूहिक अत्याचारांसह विविध कलमातंर्गत गुन्हे दाखल करत अटक केली आहे. अमित लोखंडे(२२, कैलासनगर) प्रशिक गोटे(२५) विशाल उर्फ दत्तू खाटक आणि बिट्टू वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अमित आणि दत्तू हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय तरुणी गणेशपेठ भागात आपल्या आईसोबत राहते. ती सध्या अकरावीत शिक्षण घेत आहे. पीडिते तरुणीच्या मैत्रिणीचे आरोपी अमित लोखंडेसह प्रेमसंबंध होते. मंगळवारी पीडित आपल्या मैत्रिणीसह अमितला भेटण्यासाठी वसंतनगर भागात गेली होती. तिची मैत्रिण प्रियकर अमितला भेटली. यादरम्यान आरोपी दत्तू, प्रशिक, बिट्टू यांनी पीडित तरुणाला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केले. तर अमितनेही तिचे शारीरिक शोषण केले. आरोपींनी अत्याचाराचे मोबाईद्वारे चित्रीकरण केले. तसेच या अत्याचाराबाबत कोणालाही सांगितल्यास आरोपींनी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
यानंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने घरी गाठत घटनेची माहिती बहिणीला दिली. यानंतर पीडितने बहिणीसह अजनी पोलीस स्थानक गाठत चार आरोपींविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला असून चौघांना अटक केली आहे. यानंतर बुधवारी पोलिसांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींनी २६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.