धोका वाढला! कोरोनाचा हाहाकार; नागपूरात अनेक रुग्णालयांत बेड्सची कमतरता(Coronavirus Live update) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 25, 2021

धोका वाढला! कोरोनाचा हाहाकार; नागपूरात अनेक रुग्णालयांत बेड्सची कमतरता(Coronavirus Live update)

 

                                                           (छायाचित्रे संग्रहित) 

नागपूर - कोरोना व्हायरसने देशात पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली आहे. जवळपास पाच महिन्यांनंतर देशात एकाच दिवसांत पंन्नास हजारहून अधिक रुग्ण समोर आले. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. यातच आता नागपुरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्णालयांत बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. (Corona virus cases surge in Nagpur, shortage of beds reported in some hospitals)

नागपूर GMC च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांत 600 बेड्स आहेत. मात्र, यांपैकी 90 बेड्स बेसमेंटमध्ये आहेत. हे बेड्स ड्रेनेजच्या समस्येमुळे बंद करण्यात आले आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत होतो. मात्र, आता बेड्स मिळू शकले आहेत.

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. काल नागपूर जिल्ह्यात जवळपास 3700 नवे रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या नागपुरात तब्बल 34 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

31 मार्चपपर्यंत लॉकडाउन -
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 31 मार्चपपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. केवळ नागपूरच नाही, तर बीड आणि नांदेडमध्येही संपूर्ण लॉकडाउनचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय राज्यात इतरही अनेक शहरांत लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यूसारखी बंदी घालण्यात आली आहे.

देशात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 504.4 वरून 202.3 दिवसांवर -
देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला 202 दिवस झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती.


Post Top Ad

-->