(छायाचित्र संग्रहित)
गुटखा माफिया सोडून पानपट्टी धारकांवर पोलीस प्रशासन आक्रोश
जिल्ह्यातील डोणगाव येथे गुटखा विक्री तंबाखूजन्य पदार्थ यांची मोठ्या प्रमाणात विक्री सर्रासपणे सुरू असते मात्र आपण कारवाई करू शकत नाही कारण धागेदोरे जुळलेले असतात अशातच आपला आक्रोश कोणावर काढायचा तर पोलीस प्रशासन किरकोळ विक्री पानपट्टी धारकांवर आपला आक्रोश काढून कारवाईच्या नवावर उदो उदो करतात आपला गाजावाजा करत असतात मात्र गुटखा माफिया वर कधीच कारवाई होताना दिसून येत नाही गुटखा माफियांना पोलिसांचे अभय असल्याचे यामध्ये सिद्ध होत आहे अशातच डोणगाव मध्ये मागिल १/३/२०२० या या संपूर्ण महिन्यात कशा प्रकारे झाल्या तंबाखूजन्य पदार्थां प्रकरणी थातूरमातूर कारवाई.
(छायाचित्र संग्रहित)
डोणगाव येथील १४/३/२०२० रोजी झालेली कारवाई .हकीकत अशाप्रकारे आहे यातील वर नमूद घटनावेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपीवर मिळालेल्या गुप्त खबरे प्रमाणे पं. च व पो. स्टाफ सह तंबाखूजन्य विरोधी पदार्थ बाबत रेड केला असता नमूद आरोपीचे पान टपरी गायछाप तंबाखू च्या प्रत्येकी १०/-रुपये प्रमाणे १०/-नग पुड्या किंमत १००/-रुपये गायछाप तंबाखूच्या प्रत्येकी ५/-रुपयेप्रमाणे २०/- नग पुड्या किंमती १००/-रूपये,एक नग गोल्ड प्लक सिगारेट पाकीट किमती ९०/-रुपये, एक नग ब्रिस्टॉल सिगारेट पाकीट किमती ६२/-रुपये एक उंट छाब बिडी १०/- नग प्रत्येकी १०/- रुपये प्रमाणे १००/- असा एकूण ४५२/- रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ माल बाळगून विक्री करताना मिळून आला अशा फिर्यादी लेखी रिपोर्ट वरून मा. ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदरचा गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास HC सै इरफान सै. शमशोदीन. ब . नं १५४१ यांच्याकडे देण्यात आला त्यांनी आरोपीस कलम ४१ १ (अ) CRPC प्रमाणे वि. कोर्ट येथे हजर राहणे बाबत सूचना पत्र देऊन रीहा केले
(छायाचित्र संग्रहित)
डोणगाव कारवाई क्रं २) दि.३/३/२०२० रोजी झालेली कारवाई.कलम ६(b), cotpa Act फिर्यादी-पोउपणी शिवाजी राठोड पो स्टे डोणगाव आरोपी-शेख इरफान शेख युसुफ वय ३४वर्ष रा डोणगाव घटनास्थळ- डोणगाव टाऊंन व ता वेळ दि ०३/०३/२०२०चे १८.३० वा हकीकत-अशाप्रकारे आहे की यातील फिर्यादी पाउपनी शिवाजी राठोड पो स्टे डोणगाव यांना पोलीस स्टेशनला हजर असताना फिर्यादीस गुप्त बातमी द्वारा कडून खात्रीलायक खबर मिळाली की यातील आरोपी नामे शेख इरफान शेख 34 वर्ष रा. डोणगाव हा त्याचे साई पान सेंटर वर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत आहे अशा खबरे वरून फिर्यादी व फिर्याद पोलीस स्टाफ व पंच असे जाऊन पाहिले असता आरोपी हा त्याचे पान टपरी मध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकताना दिसून आल्याने आरोपीचे पानटपरीवर छापा मारून पंचा समक्ष झडती घेतली असता आरोपीचे पान टपरी मध्ये गायछाप तंबाखू चा एकूण १६/- नग तंबाखूच्या पुड्या किंमती ८०/-रुपये कुल कंपनीचे सिगरेटचे १ पाकिट कि५५/- ब्रिस्टॉल कंपनीचे सिगरेट पाकीट किंमत १५०/- गोल्डन फलक कंपनीचे सिगारेट २ पाकिट किंमत १९०/- रुपये एकूण ४७५/-रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ अवैधरित्या मिळून आला तंबाखूजन्य पुड्या व सिगारेट पाकीट इशारा तंबाखू से कॅन्सर होता है असे नमूद आहे म्हणून सदर चा माल घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे पंचांसमक्ष जप्त करून जाळून नाश करण्यात आला आहे . अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदर गुन्हा मा. ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने दाखल करून तपास पोउपनी शिवाजी राठोड पो स्टे डोणगाव यांच्याकडे देण्यात आला
(छायाचित्र संग्रहित)
डोणगाव कारवाई क्रं ३) दि ०२/०३/२०२० वेळ :२१:४० हकीकत अशाप्रकारे आहे कि , यातील फिर्यादी पोहेकॉ गजानन धोंगडे ब.नं १५६१पो .स्टे डोणगाव यांना पोलीस स्टेशन डोणगाव यांना पोलीस स्टेशनला हजर असतानां फिर्यादीस .गुप्त बातमीद्वारणकडून खात्रीलायक खबर मिळाली कि, यातील आरोपी नामे अकिलशाह अफसर शहा वय ३८ वर्ष रा. डोणगाव हा त्याचे डोणगाव येथील आरेगाव कडे जाणाऱ्या रोडचे बाजूला असलेल्या पानटपरीमध्ये अवैदरीत्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत आहे .अशा खबरेवरून फिर्यादी व फिर्याद मधील पोलीस स्टाफ व पंच असे जाऊन पहिले असता आरोपी हा त्याचे पानटपरीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकतांना दिसून आल्याने आरोपीचे पानटपरीवर छापा मारून पानटपरीची पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीचे पानटपरीमध्ये गाय छाप तंबाखूच्या प्रत्येकी ५/-रु प्रमाणे एकूण ३०नग तंबाखूच्या पुड्या किमती १५०/-रु ,कुल कंपनीच्या सिगारेट चे एक पाकीट किंमत १००/- रु असा एकूण ३५०/- रु चा तंबाखूजन्य पदार्थ अवैदरीत्या मिळून आला .सदर तंबाखूजन्यपुड्या व सिगारेट चे पाकिटावर इषारा तंबाखुसे कॅन्सर होता है असे नमूद आहे म्हणून सदरचा माल घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे पंचासमख जप्त करून घटनास्थळाचे बाजूला नाल्यामध्ये नाश करण्यात आला अशा फिर्यादी चे लेखी रेपोर्टवरून सदर गुन्हा मा .ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने दाखल करून तपास पोहेकॉ गजानन धोंगडे ब .नं १५६१ पो .स्टे डोणगाव यांचे कडे देण्यात आला
डोणगाव कारवाई क्रं ४) दिनांक ०२/०३/२०२० वेळ २१:१८ पानटपरीची पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीचे पान टपरी मध्ये गायछाप तंबाखू च्या प्रत्येकी १०/- रू प्रमाणे एकूण १०/- रुपये प्रमाणे एकूण २० नग तंबाखूचे पुड्या किमती ५/- रू प्रमाणे किंमत १००/- रू असा एकूण ५५०/- रू चा तंबाखूजन्य पदार्थ अवैधरित्या मिळून आला सदर तंबाखूजन्य पुड्या व सिगरेटचं पाकिटावर इशारा तंबाखू से कॅन्सर होता है असे नमूद आहे म्हणून सदरचा माल घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे पंचासमक्ष जप्त करून घटनास्थळाचे बाजूला नाल्यांमध्ये नाश करण्यात आला अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदर गुन्हा मा. ठाणेदार साहेब यांचे आदेशाने दाखल करून तपास पोहेकॉ गजानन धोंगडे ब. नं १५६१ पो स्टे डोणगाव यांच्याकडे देण्यात आला.
(छायाचित्र संग्रहित)
अशाप्रकारे डोणगावत एका महिन्यात तब्बल चार कारवाया झाल्या यामध्ये मोठे मासे जाळ्यामध्ये ओळखले नाही की जाणून बुजून अडकवले नाही हा गंभीर प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो आणि याला बळी मात्र किरकोळ पानपट्टी धारक त्यांचा उदरनिर्वाह त्याच पाणीपट्टीच्या व्यवसाय वर अवलंबून असतो त्याच पानपट्टी वर मात्र हे पोलीस प्रशासन कारवाया करत असतात आणि गुटखा माफियांना अभय देतात..?
ह्या सर्वच कारवाया फक्त नावासाठी का की बस आपला उदो उदो करून घेण्यासाठी असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत चालली आहे नेमकं याला जबाबदार कोण या संपूर्ण बाबीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का..?