यवतमाळ: यवतमाळ शहरातील उचभ्रू शिवाजी नगरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उगडकीस आली. मेघना रविराज चौधरी (35) रा. पिंपळगाव, ता. पुसद जि. यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे. पती रविराज रमेश चौधरीने खून केल्याची माहिती आहे. नातेवाईकाकडे मुक्कामी आले असता पत्नीचा गळा आवळून व चाकूने वार करत खून केला.
आरोपी पती पोलिसाच्या ताब्यात असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे.. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. जावई उमेश ठाकरे रा. शिवाजीनगर यवतमाळ यांच्याकडे आरोपी रविराज पत्नी मुलासह आला होता. दोन महिन्यांपूर्वी आरोपीचा अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला, उपचार घेण्यासाठी तो यवतमाळला आला होता. बुधवारी रात्री त्याने चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. ही घटना आरोपीनेच जावयाला सांगितली. जावई उमेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी रविराज चौधरी याला अटक केली.