पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका
(मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेची मागणी) बातम्या संकलित करू दया
मंत्रालयासहीत विविध शासकीय कार्यालयात प्रवेश दया
मुंबई :पत्रकार हा देशातील लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे त्यांच्यावर संचारबंदी लावु नका असे मत मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे पत्रकार मग तो प्रिंट मिडिया चा असो कि ईलेक्ट्रॉनिक मिडिया चा आपल्या जीवाची परवा न करता विविध प्रकारच्या बातम्या संकलित करुन सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतो दि २६:११चादहशतवादी हल्ला असो कि कोरोना महामारचे संकट असो जीवावर उदार होऊन बातम्या संकलित करतो त्यामुळे जनतेत जनजागृती होते सरकारने नेमकं त्याच्यावर संचारबंदी लावल्या मुळे लोकशाही चा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केला आहे पुढें प्रसिद्धी पत्रकात नमुद आहे कि पत्रकारांना व त्यांच्या परिवारातील प्रत्येक माणसाला संरक्षण करण्यासाठी घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे