सरोवराचा विकास झाल्यास हजारो नाही तर लाखो पर्यटक येतील, त्यामुळे स्थानिकांची आर्थीक परिस्थिती सुधारेल, राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी व्यक्त केले मत..
(Aapala vidarbh live देवानंद सानप लोणार)
आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी हे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी आलेले असून सिंदखेडराजा पाहणी नंतर लोणार सरोवराला राज्यपाल यांनी भेट दिलीय.. यादरम्यान राज्यपाल यांनी पत्रकारांनी लोणार सरोवर बद्दल विचारलं असता याठिकाणी येऊन त्यांना चांगलं वाटले म्हणत ,लोणार सरोअवर हे अमूल्य ठेवा आहे, राज्यपाल यांनी लोणार सरोवराचा विकास झाल्यास याठिकाणी हजारो नव्हे तर लाखो पर्यटक येतील आणि स्थानिक लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे मत व्यक्त केलय.. तर लोणार सरोवर जगाच्या नकाशावर कायम राहिल अशी भावना व्यक्त केलीय..